Purushottam Jadhav - पुरुषोत्तम जाधव

शिवसेना जिल्हाप्रमुख सातारा.
संयोजक:- यशवंत सातारा कुस्ती संघ.

#वाई येथे दिव्यांग मुलांची ‘रेवेका’ शाळेला सर्वोतोपरी मदत करणार – पुरुषोत्तम जाधव
वाई येथील #रेवेका साहिल अक्षर इन्स्टिट्यूट या मूकबधिर विद्यार्थ्यांच्या शाळेला सर्वोतोपरी मदत करणार असल्याचं आश्वासन #बाळासाहेबांची_शिवसेना जिल्हाप्रमुख #पुरुषोत्तम_जाधव यांनी दिलं. मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे यांच्या वाढदिवसानिमित्त विद्यार्थ्यांना खाऊ तसेच शालेय साहित्य वाटप कार्यक्रमात ते बोलत होते.
यावेळी विकास शिंदे यांच्यासह इतर मान्यवर, पदाधिकारी, शिक्षक उपस्थित होते. मुख्यमंत्र्यांच्या वाढदिवसानिमित्त जिल्ह्यात आरोग्य शिबीर, शालेय विद्यार्थ्यांना खाऊ व शालेय वस्तुंचे वाटप, अनाथ आश्रमातील रुग्णांना फळे तसेच मेडीकल कीट वाटप आदी कार्यक्रम घेण्यात आले.
वाई येथील दिव्यांग शाळेत पुरुषोत्तम जाधव यांच्या हस्ते वह्या, पेन व खाऊ वाटप करण्यात आले. विकास शिंदे यांनी मनोगतामध्ये शाळेला भेडसावणाऱ्या समस्यांविषयी सांगून पुरुषोत्तम जाधव यांनी यात लक्ष घालून सहकार्य करण्याची विनंती केली. विशेषतः शाळेला आणखी शिक्षकांची आवश्यकता असल्याचे व्यवस्थापकांनी निदर्शनास आणून दिले. शाळेला आगामी काळात सर्वोतोपरी मदत करु, असा विश्वास यावेळी पुरुषोत्तम जाधव यांनी दिला.

पसरणीच्या श्री काळभैरवनाथ मंदीर जिर्णोध्दारासाठी सहकार्य करणार – पुरुषोत्तम जाधव

लोकांच्या सेवेत सदैव तत्पर असणाऱ्या महाराष्ट्राचे लोकनायक, साताऱ्याचे भूमिपूत्र मुख्यमंत्री मा. श्री. एकनाथजी शिंदे साहेब यांना जन्मदिनाच्या हार्दिक शुभेच्छा

Back to Top
Product has been added to your cart