.मु.पो.अटीत,तालुका- खंडाळा ,जिल्हा-सातारा

मी एका गरीब , वारकरी ,कष्टकरी , शेतकऱ्याचा मुलगा दुष्काळी तालुक्यातील शेतीवर भागत नाही म्हणून माझे आई वडिलांनी पुणे येथे हातगाडी वर भेळ विक्रीचा व्यवसाय करून आम्हा भावंडांना लहानाचे मोठे केले त्यामुळे माझे बालपण अत्यंत हलाखीमध्ये त्यामुळे माझे महाविद्यालयीन शिक्षण अर्धवटच झाले.
वयाच्या अठराव्या वर्षी मी पोलीस दलामध्ये खेळाडू म्हणून भरती झालो. अनेक मैदानी स्पर्धा व सांघिक स्पर्धांमध्ये पोलीस दलाचे नेतृत्व केले. अनेक राष्ट्रीय खेळाडूंना घडवण्याचे काम माझ्या हातून झाले.
क्रीडा क्षेत्रातील दहा वर्षाच्या उल्लेखनीय कामगिरीमुळे मला महाराष्ट्र शासनाच्या मुख्यमंत्री कोट्यातून खेळाडू म्हणून पुणे येथे सदनिका मिळाली आहे..

स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा, पुणे ग्रामीण येथे कार्यरत असताना अनेक प्रकारच्या गुन्ह्यांचे तपास लावले .गॅंगवॉर मधील गुन्हेगार पकडले अँन्टी डेकॉयटी स्कॉडमध्ये उल्लेखनीय काम केले. अनेक फरारी गुन्हेगारांना पकडले..
अँटी करप्शन ब्युरो पुणे येथे लाच लुचपत प्रतिबंधक कायद्यामध्ये लोकसेवक या सदराखाली येणाऱ्या अनेक भ्रष्टाचारी अधिकाऱ्यांच्या चौकशा केल्या तसेच अनेक भ्रष्ट अधिकाऱ्यांना लाच घेताना रंगेहात पकडले आणि भ्रष्टाचारी अधिकाऱ्यांच्या विरुद्ध उल्लेखनीय काम म्हणजे स्वतः फिर्यादी मिळवून अनेक भ्रष्टाचारी अधिकाऱ्यांना लाच घेताना सापळा रचून रंगेहात पकडले…
अशा प्रकारे केलेल्या प्रामाणिक कामामुळे अनेकदा वरिष्ठ I P S अधिकाऱ्यांकडून जीएसटी ( गुड सर्विस तिकीट ) देऊन वेळोवेळी गौरविण्यात आले…
वीस वर्षाच्या पोलीस सेवेमध्ये काम करत असताना वेळोवेळी अपघातग्रस्तांना वेळेवर औषधोपचार मिळवून देण्याचे काम सातत्याने केल्यामुळे अनेक अपघातग्रस्तांचे प्राण वाचवले म्हणून रस्त्यावरील अपघात या विषयावर काम करणारी संघटना कै. राजश्री परमार फाउंडेशन मार्फत दिला जाणारा “मानवमित्र “(देवदूत ) पुरस्कार केंद्रीय मंत्री मोहन धारिया यांच्या हस्ते मिळाला..

पोलीस दलातून बाहेर पडल्यावर पुणे येथे दुग्ध व्यवसाय केला. नंतर बांधकाम व्यवसायामध्ये प्रामाणिकपणे व सचोटीने यश संपादन केले त्यानंतर समाजसेवा करण्यासाठी 2008 साली निवडक सहक-यांच्या साथीने “पुरुषोत्तम जाधव जनकल्याण प्रतिष्ठान” या सामाजिक संस्थेची स्थापना केली. प्रतिष्ठानच्यावतीने अपंग बांधवांना मोफत अवयव दान शिबिरे, तरूणांसाठी मोफत पोलिस व सैन्य भरतीपुर्व प्रशिक्षण शिबिरे, खेळाडूंना प्रोत्साहन मिळावे यासाठी “राज्यस्तरीय सह्याद्री केसरी” नावाने कुस्तीचा भव्य आखाड्याचे आयोजन, शहिदांच्या आठवणी सदैव स्मरणात राहाव्यात या हेतुने शहिदांच्या गावी कमानी उभारणे, धार्मिक विचार वाढावेत या हेतुने गावोगावी भजन स्पर्धा, आरोग्यदायी जीवनासाठी योग शिबिरे, वृद्धांसाठी मोफत नेत्रतपासणी व मोतीबिंदू शस्त्रक्रिया शिबिरे, विद्यार्थींना प्रोत्साहन मिळावे यासाठी दहावी बारावी परीक्षेतील गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार समारंभ व राज्यामध्ये प्रथम येणा-या सातारा जिल्ह्यातील विद्यार्थ्यांला एक लाख रुपयांचे रोख बक्षीस जाहीर केले, शेतक-यांसाठी विविध मार्गदर्शन शिबीरांचे आयोजन, गावात एकी रहावी या हेतुने एक गाव एक गणपती असे शेकडो समाजहितचे उपक्रम राबवले.
सामाजिक काम करताना अनेक मर्यादा येतात म्हणून सत्तेच्या माध्यमातून काम करण्याच्या हेतूने खाकी मधून खादीमध्ये जाऊन काम करण्याचा निर्णय घेतला..

हिंदुरुदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या ज्वलंत विचारांनी प्रेरित होऊन शिवसेना या पक्षामध्ये प्रवेश केला त्यांनी मला सातारा लोकसभा लढण्याचा आदेश दिला मी कमी कालावधीत लोकसभा लढवून धनुष्यबाण घरोघरी पोहोचवला 2009 लोकसभा निवडणुकीत 2,35,000 मते मिळाली.

हिंदुरुदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या आदेशाने सातारा जिल्ह्याची पक्ष बांधणी करण्यासाठी मला जिल्हाप्रमुख पद दिले जिल्हाप्रमुख झाल्यावर पूर्ण सातारा जिल्ह्यामध्ये रात्रंदिवस शिवसेना पक्ष वाढवण्याचे काम केले शिरवळ-लोणंद- फलटण बारामती चौपदरीकरणग्रस्त शेतक-यांना योग्य मोबदला मिळावा यासाठी आंदोलन, वीर, देवघर प्रकल्पग्रस्तांचे पुनर्वसन व्हावे यासाठी पायी दिंडी आंदोलन, शिवाजीनगर ता. खंडाळा, देगाव ता. सातारा येथिल शेतक-यांच्या सातबारा वरील एमआयडीसीचे शिक्के काढावेत यासाठीचे आंदोलन, महाबळेश्वर मधील पर्यटन स्थळांची दुरूस्ती व्हावी यासाठी केलेले आंदोलन, जिहे कटापुर उपसा सिंचन योजनेसाठी केलेले आंदोलन, महु हातेगर आंदोलन अशी शेकडो आंदोलने करत सत्ताधारी राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसच्या प्रस्थापित राजकारण्यांच्या विरुद्ध जिल्ह्यात शिवसेनेचे संघटन करीत मतदार वाढवले.
2014 च्या लोकसभेची तयारी केली आणि त्यावेळी मोदी लाटेमध्ये सातारा जिल्ह्यामध्ये शिवसेनेचा भगवा फडकलाच असता परंतु युतीचे जागा वाटप होण्याच्या अगोदरच छत्रपती शिवरायांच्या गादीचा जिल्हा कोणतेही कारण नसताना कोणतीही आणि कोणाचीही मागणी नसताना मित्रपक्ष रिपाई ला सोडण्यात आला त्यामुळे 2009 लोकसभा निवडणुकीमध्ये मला मिळालेल्या अडीच लाख मतदारांसाठी मी नाईलाजाने जिल्हाप्रमुख पदाचा राजीनामा देऊन राष्ट्रवादी पक्षाचे विद्यमान खासदार छ.उदयनराजे भोसले यांच्या विरोधात सातारा जिल्ह्यातील जनतेला सक्षम पर्याय देण्यासाठी अपक्ष लोकसभेच्या मैदानात उतरलो. अन्यायाविरोधात लढा देणे हे माझ्या रक्तातच आहे. राजकिय भविष्याचा विचार न करता बाळासाहेबांच्या हिंदुत्वासाठी कट्टर शिवसैनिक म्हणून मी न डगमगता अपक्ष निवडणूक सक्षमपणे लढलो…

लोकसभा 2014 निवडणुकीत अपक्ष 1,56000 मतदान जनतेने मला दिले होते.

यानंतर मा. देवेंद्रजी फडणवीस यांच्या संपर्कातून माझा हिंदुत्वाचे काम करण्यासाठी भारतीय जनता पक्षामध्ये मध्ये प्रवेश केल्यानंतरही हिंदुरुदयसम्राट बाळासाहेबांच्या शिकवणीप्रमाणे मी 80 टक्के समाजकारण 20 टक्के राजकारण काम अखंडितपणे करत राहिलो.

2014 विधानसभा निवडणुकीच्या वेळी शिवसेना-भाजपा युती तुटली. त्यावेळी भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष देवेंद्रजी फडणवीस यांनी मला भारतीय जनता पक्षाचा उमेदवार म्हणून वाई खंडाळा महाबळेश्वर विधानसभा मतदार संघाची उमेदवारी दिली मी प्रामाणिकपणे घरोघरी कमळ चिन्ह पोचवण्याचे काम केले आणि विधानसभा निवडणुकीला सामोरे गेलो.

राज्यात व केंद्रामध्ये भाजपा सरकार आले. मी थेट जनसंपर्कावर भर देत सतत सामाजिक काम करत राहिलो.
“झी महाराष्ट्र कुस्ती या स्पर्धेमध्ये सातारा संघ नव्हता मी आयोजकांना त्या स्पर्धेत सातारा संघ घ्यायला भाग पाडलं आणि तो संघ आयपीएलच्या धर्तीवर मी विकत घेतला यशवंत सातारा कुस्ती संघ असे नामकरण केले हा संघ या स्पर्धेमध्ये उपविजेता ठरला या स्पर्धेच्या माध्यमातून या कुस्ती स्पर्धेच्या माध्यमातून गोरगरीब शेतकऱ्यांच्या मुलांचा हा खेळ महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात आणि घराघरात पोहोचला यशवंत सतरा संघाने पुरुषोत्तम जाधव हे नाव देखील त्याबरोबर घरोघरी पोहोचले होते कुस्ती देखील घराघरांमध्ये पोहोचली.
सातारा लोकसभा मतदारसंघ युतीच्या वाटपात शिवसेनेकडे असल्या राष्ट्रवादीचे खासदार उदयनराजे भोसले यांच्याविरुद्ध सक्षम उमेदवार म्हणून लढण्यासाठी सेनेमध्ये माझा प्रवेश घेण्यात आला परंतु आयत्या वेळी माथाडी कामगारांचे नेते नरेंद्र पाटील यांना उमेदवारी देण्यात आली आणि त्यावेळी मला वाई खंडाळा महाबळेश्वर विधानसभा लढा असे सांगून मला थांबवण्यात आले…

विधानसभेच्या वेळी वाई विधानसभा मतदारसंघ अचानकपणे भाजपचे
मी 2019 च्या लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीची तयारी केली होती परंतु पक्षप्रमुखांच्या निर्णयानुसार मी पक्षाने दिलेल्या उमेदवारांचे प्रामाणिकपणे काम केलं…

कोरोना काळामध्ये संपूर्ण जिल्ह्यामध्ये स्वतः हॉस्पिटलमध्ये जाऊन डॉक्टर आणि परिचारिका आणि कर्मचारी यांना स्वखर्चाने लाखो रुपयांचे पीपीए किट स्वतः सातारा जिल्ह्यातील सर्व रुग्णालयामध्ये जाऊन वाटप केले. त्यावेळी कोणताही पुढारी रस्त्यावर फिरत नव्हता. हे वास्तव आहे. मी 100% राजकारण विरहित समाजकारण करत होतो. कारण त्या वेळची शिवसेना काँग्रेस राष्ट्रवादी बरोबर महाआघाडी करून फक्त वैयक्तिक स्वार्थासाठी सत्तेमध्ये गेली होती. हे न पटल्याने राजकीय काम बंद करून फक्त हिंदुत्व जपून समाजकारण करत राहिलो..

सातारा जिल्ह्याचे सुपुत्र महाराष्ट्राचे मुख्यमंत्री नामदार एकनाथजी शिंदे साहेब यांच्या नेतृत्वाखाली आणि मार्गदर्शनाखाली हिंदुत्वाचे काम करण्यासाठी मी सातारा जिल्ह्यामध्ये प्रथम भूमिका जाहीर करून मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब यांच्या बरोबर रात्रंदिवस काम करत आहे. म्हणूनच मुख्यमंत्री एकनाथ भाई शिंदे यांनी माझ्यावर सातारा जिल्ह्याची जिल्हाप्रमुख म्हणून जबाबदारी सोपवली. म्हणून 2024 च्या निवडणुकांसाठी साठी शिवसेना वाढवण्याचे काम सतत जुन्या नव्या शिवसैनिकांना एकत्र आणून समाजातील तळागाळातील अपेक्षित घटकांसाठी काम करण्याचं काम मी करत आहे.

मी हिंदुत्वाचे काम करण्यासाठी तसेच सातारा जिल्ह्यात पक्षाची बांधणी करण्यासाठी सातारा जिल्ह्याचा शिवसेनेचा जिल्हाप्रमुख म्हणून मुख्यमंत्री साहेबांच्या आदेशाने काम सुरू केले आहे.
मी जनसेवेचे काम माझ्या शेवटच्या श्वासापर्यंत करत राहणार आहे. सर्वसामान्य ची लढाई चालूच ठेवणार आहे. मला छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचा वारसा घेऊन काम करायचे आहे. सामाजिक, वैचारिक व राजकीय बदल घडवण्याची ताकद तुम्हा-आम्हा सर्वसामान्य जनतेमध्ये असते. पण त्यासाठी गरज असते ती एका कृतीची.

कोणतीही सामजिक विकासाची चळवळ एकटा माणूस कधीच उभी करु शकत नाही. त्यासाठी आवश्यक आहे हजारो समविचारी लोकांची. मी आपल्या भागाचा, जिल्ह्याचा बदल करण्यासाठी एक पाऊल उचलले आहे. मला गरज आहे तुमच्या कृतीशील विचारांची, सहकार्याची. तुम्ही कोणत्याही राजकीय विचारांचे, धर्माचे, जातीचे असलात तरी एक सुजाण भारतीय नागरिक व मैत्रीच्या नात्याने तुमच्या मनात एखादे सामाजिक काम, समस्या किंवा एखादी कल्पना असेल तर मला कळवा आपण सर्व मिळुन एक सर्वगुणसंपन्न, निरोगी, विकसित समाज घडवूया.
राजकारणात प्रवेश केल्यापासून सातत्याने हसतमुखाने संघर्षाचा जो सामना केला आहे त्याचे फळ म्हणजे आज ना. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस या दोघांचेही सातारा जिल्ह्याचे भूमीपुत्र निष्ठावंत मित्र म्हणून सातारा जिल्ह्याचा विकास मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री माझ्याकडून करून घेतील असे मला प्रामाणिकपणे वाटते.. आपला नम्र.
पुरुषोत्तम जाधव, शिवसेना जिल्हाप्रमुख सातारा.

Back to Top
Product has been added to your cart